‘कसाबच्या वकिलांचे शुल्क शहिदांच्या कुटुंबियांना द्या’ Print

पीटीआय , नवी दिल्ली
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी न्यायमित्राची भूमिका बजावून त्यापोटी मिळणारे जवळपास १५ लाख रुपयांचे मानधन न्यायिक सेवा प्राधिकरणाला देणगी म्हणून देऊन उच्च प्रतीची व्यावसायिक नीतिमत्ता दर्शवून देणारे वकील राजू रामचंद्रन आणि गौरव अग्रवाल यांच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी प्रशंसोद्गार काढले. न्या. आफताब आलम आणि न्या. सी. के. प्रसाद यांच्या पीठाने सदर दोन्ही वकिलांचा गौरव करून मानधनाची रक्कम मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या १८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि अन्य सुरक्षारक्षकांच्या कुटुंबीयांना समान पद्धतीने वाटण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले.