सोनियांनी फुंकले रणशिंग Print

पीटीआय , राजकोट

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मात्र, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांना थेट उत्तर देणे त्यांनी टाळले. सोनिया गांधी यांच्या विदेशवारींवर सरकारी तिजोरीतून तब्बल अठराशे ऐंशी कोटी रुपये खर्च झाले असल्याचा गंभीर आरोप मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. देशाच्या हिताचे निर्णय आम्ही जेव्हा-जेव्हा घेतो तेव्हा आमच्यावर विरोधकांकडून सर्व प्रकारचे हल्ले होतात, मात्र या प्रकारांची आम्ही कधीच पर्वा केली नाही व भविष्यातही करणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. राजकोट येथे झालेल्या एका शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या.
भाजपची प्रतिटीका
* यूपीए सरकारच्या राजवटीत लाखो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असताना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भ्रष्टाचाराचे नाव घेऊन गुजरात सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकारच नाही.
* कोळसा खाणीवाटप घोटाळ्यात खुद्द पंतप्रधानांवरच गैरव्यवहारांचे आरोप होत आाहेत.
* भ्रष्टाचाराबद्दल तुरुंगवास झालेल्या सुरेश कलमाडी यांना संसदीय समितीत स्थान देण्यात आले आहे.
*  भाजपचे नेते दुसऱ्यांना उपदेश करण्यात पटाईत आहेत, मात्र त्यांची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. भाजपच्या नेत्यांनी वा तेथील मुख्यमंत्र्यांनी त्यावर काहीच कारवाई केलेली नाही.
*  गुजरातमध्ये तर गेली आठ वर्षे लोकायुक्ताची नियुक्तीच करण्यात आलेली नाही.
*  भाजपचे नेते संसदेचे कामकाज चालू देत नाहीत, लोकपाल विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ नये, यासाठी प्रयत्न करतात.
*  किरकोळ क्षेत्रात विदेशी थेट गुंतवणुकीला परवानगी देऊ नये, अशी मागणी विरोधक करत आहेत. मात्र केंद्राने हा निर्णय घेतला तरी त्याची अंमलबजावणी करणे वा न करणे हे पूर्णपणे प्रत्येक राज्याच्या हाती असल्याने विरोधकांची आगपाखड समजण्याच्या पलीकडची आहे.