ब्रार यांच्यावरील हल्ल्यांच्या चौकशीसाठी चार जणांना अटक Print

alt

लंडन, ५ ऑक्टोबर २०१२
निवृत्त लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार यांच्यावर लंडनमध्ये झालेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी मेट्रोपोलिटन पोलिसांनी ४० वर्षीय महिलेसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. पंजाबमध्ये २८ वर्षांपूर्वी झालेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मध्ये ब्रार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.  
मध्य लंडनमधील हाइड पार्क परिसरात असलेल्या क्युबेक रस्त्यावर लेफ्ट. जन. ब्रार यांच्यावर ३० सप्टेंबर रोजी चार अज्ञात व्यक्तींनी सुऱ्याने वार केले होते. यासंदर्भात पोलिस अधिका-यांनी आज संध्याकाळी तीन पुरूष आणि एका महिलेला अटक केली आहे, असे मेट्रोपोलिटन पोलिसांच्या प्रवक्त्यांनी काल (गुरूवार) पीटीआयला सांगितले. त्यांनी सांगितले की, चारही संक्षयीतांना मध्य लंडनच्या पोलिस ठाण्यात आणले गेले आणि त्यांची अधिका-यांमार्फत चौकशी करण्यता आली. भारतीय वेळेनुसार काल रात्री साडेदहा वाजता वोल्वरहैम्पटन येथून ३३ वर्षीय एक पुरूष आणि चाळीस वर्षीय महिलेला अटक करण्यात आल्याची माहिती प्रवक्त्यांनी दिली.
त्यानंतर अर्धा तासाने पश्चिम ब्रोमविच येथे एका कारला थांबवून आणखी एका ३४ वर्षीय इसमाला अटक करण्यात आली. याच परिस्थितीत भारतीय वेळेनुसार रात्री साडेबारा वाजता आणखी एका २५ वर्षीय तरूणाला अटक केली. अटक करण्यात आलेल्य़ा सर्व संशयीतांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.  
मध्य लंडनमधील हाइड पार्क परिसरात असलेल्या क्युबेक रस्त्यावर लेफ्ट. जन. ब्रार यांच्यावर चार अज्ञात व्यक्तींनी सुऱ्याने वार केले होते. यात ब्रार जखमी झाले होते. विशेष म्हणजे ब्रार यांना लंडनमध्ये झेड सुरक्षा होती. जखमांचे स्वरूप विशेष काळजी करण्याजोगे नसल्याने उपचारांती त्यांना घरी सोडण्यात आल्यानंतर ते भारतात परतले आहेत. अमृतसरमधील सुवर्णमंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांना ठार करण्यासाठी आखलेल्या  ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व या माजी लष्कर उपप्रमुखांनी केले होते. तत्कालीन लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात १० ऑगस्ट १९८६ रोजी याच प्रकरणी दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.