माहुली किल्ल्यावर धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू Print

शहापूर : 
मुंबईतील एका संस्थेतर्फे माहुली किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगसाठी आलेल्या तरुणाचा धबधब्याखाली कुंडात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. राजेश भुवड (२७, बोरिवली) असे त्याचे नाव आहे. ‘ऑफबिट इंडिया’ या संस्थेचे वरद नाईक हे सुमारे ४० तरुणांचा चमू घेऊन वॉटरफॉल रॅपलिंगकरिता येथील माहुली किल्ल्यावर आले होते. तेथे दुसऱ्या गटाचे वॉटरफॉल रॅपलिंग सुरू असल्याने त्यांचा चमू थांबला होता. त्या वेळात तेथील कुंडात राजेश भुवड पोहण्यासाठी गेला. त्यात तो बुडाला. नाईक आणि त्यांच्या चमूने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले.