डोंबिवलीत संतप्त जमावाची साखळीचोराला बेदम मारहाण Print

डोंबिवली : एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पलायन करणाऱ्या चोराला सुमारे चारशे ते पाचशे नागरिकांच्या जमावाने पकडून बेदम मारहाण केल्याची घटना गुरूवारी रात्री डोंबिवलीतील बाजीप्रभू चौक भागात घडली. दीपक काकडे असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर धारदार शस्त्राचे वारही करण्यात आले आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. नेतिवली येथील रहिवासी असलेला दीपक व त्याच्या साथीदाराने रात्री नऊच्या सुमारास  गणपती मंदिराजवळ एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली होती.