अरविंद केजरीवाल आणि कार्यकर्त्यांची सुटका Print

alt

नवी दिल्ली, १३ आँक्टोबर २०१२
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल आणि कार्यकर्त्यांची बवाना कारागृहातून आज (शनिवार) सूटका करण्यात आली. केजरीवाल आणि त्यांच्या समर्थकांनी काल केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केले असता दिल्ली पोलिसांनी केजरीवाल आणि समर्थकांना अटक केली होती. "कायद्यानुसार त्यांनी आम्हाला चोवीस तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करणे बंधनकारक आहे आणि त्यामुळे त्यांना आज दुपारी दोन वाजेपर्यंत आम्हाला न्यायालयापुढे हजर करणे भाग आहे.", असे केजरीवाल यांनी आज सकाळी ट्विटरवरून म्हटले होते.
केजरीवाल आणि समर्थकांना काल अटक झाल्यानंतर बवाना येथील राजीव गांधी मैदानात नेण्यात आले होते. केजरीवालांसोबत मनिष सिसोदिया आणि गोपाल राय यांनाही अटक करण्यात आली होती. कुमार विश्वास हे सुद्धा आजपासून केजरीवाल टीम मध्ये सामिल झाल्याचे स्वत: केजरीवाल यांनी काल स्पष्ट केले होते. काल (शनिवार) रात्री केजरीवालांनी ट्विटर च्या माध्यमातून "पोलिस जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना अटक करून मारहाण करुन घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहेत", अशी प्रतिक्रीया दिली होती. तसेच असे करुन आम्ही शांत होऊ असा सरकार विचार करत असेल तर ती त्यांची चूक आहे. अशी प्रत्येक घटना आमचे देशासाठी लढण्याचे बळ वाढवेल असंही ते म्हणाले.