कलमाडींची खेळाच्या मैदानातून माघार Print

नवी दिल्ली
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेबाबत आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेले भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे (आयओए) अध्यक्ष व पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनी आयओएची आगामी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. पण त्याचबरोबर आता आपल्या मतदार संघावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे.  आयओएचे गेली १६ वर्षे अध्यक्षपद भूषविणाऱ्या कलमाडी यांनी क्रीडा क्षेत्रातून माघार घेत नवीन संघटकांना संधी देण्याचे ठरविले आहे. मात्र राजकीय आखाडय़ावरच लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. कलमाडी यांनी शनिवारी येथे ही घोषणा केली.