ठाणे-पनवेलच्या गाडय़ा होणार १२ डब्यांच्या! Print

प्रतिनिधी
मुंबई
‘ट्रान्स हार्बर’ मार्गावर डिसेंबपर्यंत सर्व उपनगरी गाडय़ा १२ डब्यांच्या होणार आहेत. या मार्गावरील गाडय़ांच्या फेऱ्याही वाढविल्या जाणार आहेत.
ठाणे-वाशी आणि पनवेलदरम्यान सध्या उपनगरी गाडय़ांच्या २१० फेऱ्या होत असून त्यातील ८० फेऱ्या ९ डब्यांच्या गाडय़ांच्या आहेत. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर १५ डब्यांची गाडी मंगळवारी सुरू झाली त्यावेळी महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्व गाडय़ा १२ डब्यांच्या होण्याची शक्यता व्यक्त केली होती.