रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस Print

पीटीआय, नवी दिल्ली
दसरा-दिवाळीपूर्वीच रेल्वेतील कर्मचाऱ्यांना खुशखबर देत केंद्र सरकारने २०११-१२साठी ७८ दिवसांच्या वेतनाइतके सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयाचा रेल्वेच्या १२ लाख ३७ हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
केंद्र सरकारला जाणवणारी आर्थिक चणचण आणि रेल्वेची सद्यस्थिती या पाश्र्वभूमीवर या निर्णयाबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये उत्कंठा होती. परंतु, यंदाही कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला.
निवृत्तीवेतनात वाढ
दारिद्रय़रेषेखालील विधवा व अपंगांना दरमहा देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनापोटी देण्यात येणाऱ्या रकमेत १०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. सध्या दोनशे रुपये दरमहा असणारा हा भत्ता आता तीनशे रुपयांवर नेण्यात येणार असून त्यासाठीची वयोमर्यादाही शिथिल करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा दारिद्रय़रेषेखालील ७६ लाख विधवा आणि ११ लाख अपंगांना होणार आहे.