सचिनला आँस्ट्रेलियाचा पंतप्रधान करा Print

alt

मॅथ्यु हेडनचे उपरोधिक उद्गार
वृत्तसंस्था, १९ आँक्टोबर २०१२
सचिन तेंडुलकरला 'आँडर आँफ आँस्ट्रेलियाचा' बहुमान मिळाल्याबदद्ल माजी क्रिकेटपटू मॅथ्यु हेडनने नाराजी व्यक्त करत, हा मान विशेषत: आँस्ट्रेलियन नागरिकांनाच मिळाला पाहीजे असे मत व्यक्त केले आहे.
या सन्मानास सचिन तेंडुलकर पात्र नसून, हा मान फक्त विशेषत: ऑस्ट्रेलियन नागरिकांनाच मिळावा असं मत ऑस्ट्रेलियन रेडिओ शोच्या दरम्यान त्याने बोलताना हेडनने व्यक्त केलं. सचिन एक आदर्श व्यक्तीमत्व आहे हे मला मान्य आहे. जर सचिन आँस्ट्रेलियाचा नागरिक असता तर त्याचा सन्मान करण्यासोबत त्यालाच आँस्ट्रेलियाचा पंतप्रधान देखील करण्यास काही हरकत नसती पण मुळात सचिन भारतात राहतो, असे मॅथ्यु हेडन पुढे म्हणाला.
मला हे मान्य आहे की ऑस्ट्रेलियातही त्याच्याकडे एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहिले जाते आणि इथे देखिल त्याचे भरपूर चाहते आहेत. तसेच आँस्ट्रेलियात काम करणारे भारतीय नागरिकही मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते सर्व आँस्ट्रेलियात आनंदात राहत आहेत. आपण बहू-सांस्कृतिक आहोत त्यादृष्टीने ही आपल्या देशासाठी महत्वाचीबाब आहे." असंही तो पुढे म्हणाला.
आँस्ट्रेलियन क्रिकेटपटूंपैकी मोजक्यांनाच हा सन्मान मिळाला आहे त्यात हेडनलासुद्धा २०१० साली त्य़ाच्या क्रिकेटमधील आणि समाजातील योगदानाबद्दल त्याला हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. 'आँडर आँफ आँस्ट्रेलिया' हा सन्मान आत्तापर्यंत सर डोनल्ड ब्रँडमन, अँलन बाँर्डर, डेनिस लेल्ली, मॅक्स व्हालकर, बाँब सिम्पसन, केथ मिलर आणि स्टिव्ह व्हाँ या क्रिकेट दिग्गजांना मिळाला आहे.