गडकरींवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गंभीर दखल Print

alt

नवी दिल्ली, २३ ऑक्टोबर २०१२
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची गंभीर दखल घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गडकरींना सदर आरोपांबाबत खुलासा करण्यास सांगितला आहे. यासाठी संघाने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना नोटीस पाठविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एवढंच नव्हे तर भाजप अध्यक्षपदी दुस-या नेतृत्वाचा विचार करण्याचा सल्लाही पक्षातील ज्य़ेष्ठ मंडळींना देण्यात आला आहे.
दरम्यान, या आरोपानंतर गडकरी यांनी क्षणभरही अध्यक्षपदी राहू नये. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, असे भाजपचे राज्यसभा सदस्य राज जेठमलांनी यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांनी शेतक-यांची जमीन बळकावल्याचा आरोप केल्यानंतर गडकरी यांच्यावरील भ्रष्टाचारीची अनेक प्रकरणे बाहेर काढली जात आहेत.  
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने गडकरींवर करण्यात आलेल्या आरोपांचा स्पष्टपणे खुलासा झाला नाही, तर त्यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात यावे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणणे आहे. मात्र, आपण निर्दोष असून कुठल्याही चौकशीस तयार असल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.