लोकसभा विसर्जित करा, निवडणुका घ्या Print

अण्णा हजारे,  व्ही. के. सिंग यांची मागणी
प्रतिनिधी, मुंबई

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे आघाडी सरकार आणि लोकसभा घटनादत्त जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत असल्याची टीका करत विद्यमान लोकसभा विसर्जित करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व त्यांचे नवीन साथीदार निवृत्त लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी सोमवारी केली.
जुन्या टीम अण्णाच्या विसर्जनानंतर व्ही. के. सिंग यांच्यासारख्या नवीन सहकाऱ्यांना सोबत घेत अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन नव्याने सुरू केले. मनमोहन यांचे सरकार घटनाबाह्य असल्याची टीका त्यांनी केली. बाजारपेठेच्या दबावाला बळी पडून किरकोळ क्षेत्रात परकीय गुंतवणुकीचा निर्णय केंद्रसरकार लादत असल्याची टीका सिंग यांनी केली. व्यवस्थेत परिवर्तन आणण्यासाठी ३० जानेवारीपासून वर्षभर देशभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे हजारे म्हणाले.