अटलांटिक किनारपट्टीवर सँण्डी वादळाची धडक, १० जणांचा मृत्यू Print

alt

अटलांटिक शहर, ३० आँक्टोबर २०१२
न्यूजर्सीच्या किनारपट्टीवर सॅण्डी वादळ धडकले असून सोमवारी न्यूयाँर्क शहराजवळ समुद्रात सुमारे १३ फुट(चार मीटर) उंचीच्या लाटा उसळत होत्या. अटलांटिक शहराला वादळाने जोरदार तडाखा दिला असून आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे.
सँण्डी वादळामुळे सुमारे ३१ लाख घरांमधील वीज पुरवठा खंडीत झाला आहे आणि तिन्ही बाजूंनी पाण्याच्या दबाव वाढल्यामुळे न्यूयाँर्क शहराच्या सुमारे अडीच लाख घरांमध्ये अंधार पसरला आहे. सकाळी आठ वाजता सँण्डी वादळ अटलांटिक शहराच्या किनारपट्टीवर दाखल झाल्याचे अमेरिकेच्या राष्ट्रीय वादळ केंद्राने सांगितले आहे. उत्तरपूर्व भागातील मोठ्या शहरांना वाँशिंग्टनपासून फिलाल्डेल्फिया, न्यूयाँर्क, बोस्टन आदी शहरांपर्यंतच्या भागाला ८५ मी.प्रती तास वादळाच्या मुसळधार पावसासह जोरदार तडाखा बसला आहे. तसेच मॅनहटन शहरालगत समुद्रात १३ फुट(चार मीटर) उंचीच्या लाटा निर्माण झाल्या असून या आत्तापर्यंतच्या सर्वात उंच लाटा आहेत. न्यूजर्सी, न्यूयाँर्क, मेरिलँड, पेनसिल्व्हानिया या शहरांमध्ये आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कॅनडा शहरात वादळाच्या तडाख्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याचे टोरांटो पोलिसांनी स्पष्ट केले आहे.