तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पाऊस, चक्रीवादळाची शक्यता Print

alt

चेन्नई, ३० ऑक्टोबर २०१२
बंगालच्या खाडीत खोलवर मोठ्या प्रमाणात हालचाली होत असून त्यामुळे चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचाच परिणाम म्हणून काल (सोमवार) तामिळनाडूच्या काही भागात, विशेषत:  किनारी भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शासन शाळांना सुट्टी जाहिर करेल असे चित्र दिसत आहे.
चेन्नई, कांचीपूरम, कड्डालोर आणि विलूपुरम येथे आज (मंगळवार) सकाळी जोरदार पाऊस झाला, त्यामुळे सकाळी कार्यालय गाठणा-या लोकांचे प्रचंड हाल झाले. उद्या (बुधवार) हे चक्रीवादळ नागापट्ट्म आणि नेल्लोर पार करेल असं हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलं आहे.
पुढील बारा तासांमध्ये ४५-५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणा-या वा-यांसह जोरदार पावसाची शक्यचा वर्तवण्य़ात आली आहे.   
जसजसं हे वादळ किना-याच्या जवळ येईल तसा वा-याचा वेग वाढत जाईल.उत्तर तामिळनाडू, पॉंडिचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या लगतच्या किना-यावरील समुद्राची अवस्था पुढील ४८ तासांमध्ये बिकट असणार आहे.  
उत्तर तामिळनाडू, पॉंडिचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या लगतच्या किना-यावरील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे, असं हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.