महागाई विरोधात आज आवाज ! Print

लोकसत्ता लाऊडस्पीकर विशेष उपक्रम
प्रतिनिधी, मुंबई

एका बाजूला गॅस दरवाढ त्यातच सहा सिलेंडर्सपर्यंतच मिळणारी सबसिडी, दुसरीकडे टॅक्सी- रिक्क्षाची जवळपास दुपटीएवढी झालेली दरवाढ. त्यातच सामान्यांच्या वाहतुकीचे महत्त्वाचे साधन असणाऱ्या बेस्टचीही दरवाढ आणि आता रेल्वे मंत्र्यांनीही तिकीटवाढीचे दिलेले संकेत.. एका पाठोपाठ एक अशी येणारी ही संकटे वाढतच चालली आहेत. या दरवाढीच्या रेटय़ाखाली भरडल्या जाणाऱ्या सामान्यांच्या आवाजाला आज मोकळी वाट मिळणार आहे ती, ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ या विशेष उपक्रमात !

केवळ चर्चा करत न बसता सामान्य माणसाला बसणारे महागाईचे चटके कमी करण्याचे उपाय शोधण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे. दिवसागणिक महागाई वाढते आहे आणि जगणे असह्य होते आहे. म्हणूनच आपल्या समस्यांवर आवाज उठवून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी लोकसत्ता लाऊडस्पीकरमध्ये महागाई या विषयावर चर्चा होणार आहे. व्यासपीठावर असतील ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे सचिव आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी संचालक कॉम्रेड विश्वास उटगी, फ्यूचर ग्रुपच्या बिग बाजारचे सीओओ सदाशिव नायक, मुरबाड परिसरातील आदिवासी भागात गेली ३५ वर्षे अन्नहक्क, कुपोषण या विषयावर सातत्याने काम करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इंदवी तुळपुळे, मुंबई भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर, मुंबई ग्राहक पंचायतीच्या महिला कार्यकर्त्यां अनुराधा देशपांडे आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व सीए अरुण केळकर.
हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी असून त्यातही विविध मान्यवर आणि पत्रकारितेचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मान्यवरांमध्येही अर्थतज्ज्ञ, सीए, सामाजिक कार्यकर्ते, महागाईविरोधामध्ये झालेल्या आंदोलनातील अग्रणी नेते, राजकारणी, गुंतवणूकतज्ज्ञ, कामगार नेते आदींचा समावेश आहे. आपले प्रश्न, शंका आणि मत या कार्यक्रमात व्यक्त करण्यासाठी  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it किंवा facebook.com/loksattalive यावर आपली मते नोंदवू शकता किंवा प्रश्न पाठवू शकता.