केजरीवालांचा नवा गौप्यस्फोट - काँग्रेस व भाजप दोन्ही मुकेश अंबानी यांच्या खिशात Print

alt

नवी दिल्ली,३१ आँक्टोबर २०१२
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राजकारणी कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी आज एका दगडात तीन पक्षी मारले. दर बुधवारप्रमाणे त्यांनी आज असा गौप्यस्फोट केला की, उद्योगपती मुकेश अंबानी यांचे काँग्रेस व भाजपशी व्यावसायिक साटेलोटे आहे. काँग्रेस पक्षाच्या निर्णयांवर मुकेश अंबानी प्रभाव टाकतात असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

उद्योगपती व राजकारणी यांचे पोलखोल केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे केजरीवाल यांनी आज सांगितले. सध्या काळाच्या पडद्याआड गेलेले राडिया टेप्सचे भूत पुन्हा केजरीवाल यांनी अंबानी, काँग्रेस व भाजप यांच्या मानगुटीवर बसवले आहे.
काय म्हणाले केजरीवाल
२००६ मध्ये मणीशंकर अय्यर यांना काढून मुरली देवरा यांना मंत्री केले गेले तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठा फायदा झाला.
२०१२ मध्ये म्हणजे आताच जयपाल रेड्डी यांना काढून मोईली यांना पेट्रोलियम मंत्री केले त्यामुळे गॅस किंमती वाढल्या हे रिलायन्सचे ब्लॅकमेलिंग आहे
या प्रकरणात भाजप व काँग्रेस सारखेच गुंतलेले आहेत. भाजपने २००० मध्ये रिलायन्सबरोबर केलेला करार काँग्रेसने पूर्णत्वास नेला.
रिलायन्स इंडस्ट्रीजने गॅसच्या किंमती वाढवून मागितल्या सरकारने त्या वाढवल्या परिणामी वीज व खताचे दर वाढले.
राडिया टेप्समध्ये वाजपेयी यांचे जावई रंजन भट्टाचार्य हे नीरा राडिया यांना सांगतात की, काँग्रेस तो अब अपनी दुकान हैं असे मुकेश अंबानी यांनी आपल्याला सांगितले आहे.
काँग्रेस व भाजप हे अंबानींच्या खिशात आहेत हेच या पुराव्यातून सिद्ध होते. देशात महागाई वाढली ती कशी याची कारणे या भ्रष्टाचारात आहेत असा आरोप केजरीवाल यांनी केला.