बाजारभावाने मिळणारा स्वयंपाकाचा गॅस अधिक महागला Print

alt

पीटीआय, नवी दिल्ली
अनुदानाने मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर मर्यादा घालणाऱ्या सरकारने बाजारभावाने खरेदी करावे लागणाऱ्या सिलिंडरचेही भाव वाढवून टाकले आहेत. प्रती सिलिंडरमागे २५ रुपयांपासून पुढे वाढविले आहेत. तर वाणिज्यिक वापराचा १९ किलोचा एक सिलिंडरही १२.५० ते १५.५० रुपयांनी वाढविण्यात आला आहे. राजधानीत १४.२ किलोचा एक गॅस सिलिंडर आता ९२२ रुपयांना तर मुंबईत तो ९१५ रुपयांना मिळेल. तर १९ किलोचा वाणिज्यिक वापरासाठीचा एक गॅस सिलिंडर आता बाजारभावाप्रमाणे १,५५१ (दिल्लीत) व १,६३५ (मुंबईत) रुपयांना मिळेल. ही दरवाढ आजपासूनच लागू करण्यात आली आहे. सरकारच्या अनुदानित रकमेवर मिळणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरात (दिल्लीत प्रती सिलिंडर ४१०.४२ रुपये) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र त्यावरील वर्षांला सहा सिलिंडरची मर्यादा कायम आहे. मात्र सर्व सार्वजनिक कंपन्यांच्या बिगर अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमती आता महिन्याला सुधारित केल्या जातील, असे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने म्हटले आहे.