शॉप टिल यू ड्रॉप Print

टीम व्हिवा : तिखट-गोड चॉकलेट्स
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

चॉकलेट आणि आपण हे नातं खूपच जुनं आहे. कधीतरी एखादं चॉकलेट खाल्ल्यावर पुन्हा एकदा ते खावंसं वाटतं. पण अनेकदा गोड म्हणून चॉकलेट खाणाऱ्यांची संख्या रोडावते. परंतु आता मात्र आपल्यासाठी खास तिखट गोड चॉकलेटस् बाजारात आलेली आहेत. ही चॉकलेटस् खाल्यावर आपल्याला नक्कीच मिरची आणि चॉकलेट अशी मिक्स चव अनुभवायला मिळणार आहे.

अॅरोकेमची नैसर्गिक अत्तर
अॅरोकेम इंटरनॅशनलने आपले नवीन ग्रीन मस्क अत्तर आणले आहे. कुठल्याही सणासाठी अत्तर हे बेस्ट पर्याय आहे. हे अत्तर गाडीमध्येही फ्रेशनर म्हणून वापरता येते. केवळ इतकंच नाही तर याचा सुगंध अधिक काळ टिकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

ओरोमा मॅजिकचा नवा फेस पॅक!
सध्याच्या प्रदूषित हवेमुळे  चेहऱ्यावर तसेच त्वचेवर डाग पडण्याचा किंवा चेहरा काळा पडण्याचा धोका असतो. म्हणूनच ओरोमा मॅजिकने पेपरमिंट एक्सफ्लो जेल आणि ग्लो फेस पॅक अशी दोन उत्पादने बाजारात आणली आहेत. यातील पेपरमिंट जेलमुळे त्वचा कोमल आणि तजेलदार होते, असा कंपनीचा दावा आहे. तर ग्लो फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या जाऊन चेहरा उजळतो, असे कंपनी सांगते.