गौरी पूजेसाठी नवेद्य.. Print

गौरीच्या पूजेसाठी नवेद्याचे पदार्थ पारंपारिक असून घरच्या घरी आपल्या पद्धतीने परंपरेप्रमाणे केले जातात. हे सर्व पदार्थ गौरीच्या सणासाठी केले जातात. या पदार्थाच्या योजनेतही कल्पकता आहे. - संकलन : प्रियांका
पहिल्या दिवशी :
बाजरीची भाकरी, मेथी किंवा शेपूची भाजी, वडे, खीर, काकडीची तवसाळी, खाज्याच्या करंज्या, तांदळाचे अनारसे, रव्याचे लाडू , बेसनाचे लाडू, बुंदीचे लाडू हे सर्व पदार्थ ताटात मांडून गौरीपुढे ठेवतात.

दुसऱ्या दिवशी :
पुरणपोळी,  सोळा  भाज्या यांत  बटाटा, अळू , भेंडी, भिजवलेली  मटकी,  पडवळ , दोडका,  गवार, श्रावण  घेवडा, दुधी  भोपळा, लाल  भोपळा, गाजर, काकडी, कोबी, फ्लॉवर,घोसाळा यांची एकत्रित एकच भाजी करतात .काही  ठिकाणी बटाट्याची भाजी, अळूची  पातळ  भाजी, भेंडीची  भाजी वेगळी  करतात. इतर  भाज्यांची  एकत्रित  एकच  भाजी  करतात. यात  कांदा घालत  नाहीत .
कोिशबिरी  : टोमॅटो, गाजर, काकडी, मुळा, बीट एकत्रित करून केलेली कोिशबीर. डािळब, मोसंबी, संत्री, केळे, सफरचंद, चिकू या फळांची दही,  साखर  घालून  केलेली कोिशबीर.
चटणी : हिरव्या  मिरच्या, कोिथबीर, ओले खोबरे  एकत्रित  करून  बारीक वाटलेली  चटणी
कटाची  आमटी :  पुरण  करताना  शिजलेल्या  डाळीचे  पाणी, थोडेशे  पुरण, लवंग, कडीपत्ता, जिरे, िहग, खोवलेले  खोबर, चिंच,  गुळ, तिखट, इत्यादी.
वड्या : कोबी  आणि अळू
भात : साधा  भात,  मसाले  भात , वरण,  ताक, कढी  पाकातल्या  पुऱ्या : यात  बारीक  रवा, दही , केशर, तेलात  मळून पुऱ्या लाटून  तुपात  तळून साखरेच्या  पाकात  टाकतात.
रव्याची  गोड  पुरी : गुरवळी, रवा  साखरेची  तळलेली  करंजी
खीर : तांदूळ दुधाची, शेवयाची , गव्हाची , दुधी  भोपळ्याची यांत  दुध जास्त  प्रमाणात  असते . नवेद्यात  खीर  ही असतेच.

तिसरा  दिवस :
alt
कानोला : पुरण आणि गव्हाच्या  पीठाचे  करंज्यांसारखे आध्रे दुमडून  मुरड  घालून  तळलेले.
गव्हल्यांची खीर : गव्हले, साखर, वेलदोडे,
जायफळ, तूप .
घावन : तांदूळ  धुऊन, वाळवून, दळून, जिरे घालून धीरड्यासारखे  भिजवून  तव्यावर  पातळसर  पोळीचा आकार  देऊन  भाजलेले.
काही ठिकाणी गौरीसाठी मटणाचा नैवेद्यही दाखवला जातो. मटण वडे हे घरी येणाऱ्या प्रत्येकाला दिले जातात. कोळ्यांच्या गौरीला वेगवेगळ्या प्रकारचे मासे नैवेद्य म्हणून अर्पण करतात.