माय रेसिपी : कोथिंबीर वडी Print

योगिनी भंडारे

साहित्य : १ जुडी कोथिंबीर, पाव किलो चणाडाळ, हिरवी मिरची, लसूण, हिंग, हळद, मीठ तेल (तळण्यासाठी)
कृती : प्रथम कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून चिरावी, चणाडाळ चार तास भिजत ठेवावी. नंतर भिजवलेली डाळ मिक्सरला वाटून घ्यावी. नंतर मिरची, लसूण मिक्सरला लावून वाटून घ्यावी. चिरलेली कोथिंबीर वाटलेली चणाडाळ, वाटलेले मिरची लसूण हे मिक्षण एकत्र करून त्यात लिंबू व हळद घालून छोटे छोटे गोळे हातावर किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर थापून तेलात तळणे. कुरकुरीत वडे तयार.
हे वडे हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर सव्र्ह करावे.
माय रेसिपीसाठी तुम्ही तुमच्या रेसिपी पाठवु शकता. पण इथे सुगरणींपेक्षा नवीन प्रयोग करणाऱ्या नवोदितांना संधी आहे. याकरता This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it या मेलवर माय रेसिपी असा उल्लेख न चुकता करुन रेसिपी व आपला फोटो मेल करावा.
(फोटो मोबाइलवरून काढलेले नसावेत)