शॉप टिल यू ड्रॉप Print

टीम व्हिवा ,शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पुमाची इव्हो स्पीड रेंज

आपल्या प्रत्येकाची आवड ही निराळी असते. यालाच अनुसरून प्युमाने बाजारात खास स्र्पोटी लूक असलेल्या अ‍ॅक्सेसरीज आणल्या आहेत. यामध्ये वॉलेट, जॅकेटस् असे विविध प्रकार आहेत. तुम्हाला काय आवडतंय हा चॉईस तुमचा असणार आहे. खास स्पोर्टस् वेअरवर ह्य़ा अ‍ॅक्सेसरीज अगदी मॅचिंग होतील यात शंकाच नाही.

आय.आर.ए. टॅब
alt
सध्या टॅब हा अनेक तरूणांचं आकर्षणाचं केंद्र बनलेला आहे. टॅब हातात असणं म्हणजे आता एक स्टेटस् सिम्बॉल झालेलं आहे. आय.आर.ए. कंपनीने नवा टॅब लाँच केला आहे. मोठी आणि एल.ई.डी हाय डेफिनेशनची स्क्रिन हे या टॅबचे वैशिष्टय़ असून ‘आय.आर.ए. कोमेट एच.डी’ असे या टॅबचे नाव आहे. यामध्ये १.२ जीएचझेडचा प्रोसेसर असून १ जीबीची रॅम आहे. याची मेमरी ८ जीबी असून एक्स्पांडेबल मेमरी ३२ जिबी इतकी आहे.

आदिदासचा बॉडी स्प्रे
alt
फ्रॅगरन्स हा कुठलाही असो तो स्वतची एक ओळख निर्माण करत असतो. खास आदिदासने पुरूषांसाठी काही नवीन बॉडी स्प्रे आणले आहेत. यामध्ये लेमन, बर्गामोट आणि गॅल्बॅनम यापासून बनवलेले बॉडी स्प्रे सुगंधाबरोबरच फ्रेशनेसदेखील देतील, असा कंपनीचा दावा आहे. आकर्षक आणि स्पोर्टी लुकमध्ये हे बॉडी स्प्रे सर्वत्र उपलब्ध आहेत.

वेडिंग कलेक्शन
alt
लग्न म्हटल्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दागिने. खास लग्नाची तयारी म्हणून दागिने घडवण्यासाठी कित्येक महिने आधी ऑर्डर दिली जाते. खास बेल्सिमा या ज्वेलरी ब्रॅंडने बाजारात नव्या डिझाइन्स आणल्या आहेत. खास लग्नसराईला साजेसे असेच हे दागिने आहेत.