टेस्टी टेस्टी : घरच्या घरी तंदुरी पदार्थ Print

शेफ देवव्रत जातेगावकर, शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
alt

गणपतीचं विसर्जन झाल्यावर लगेचच नॉनव्हेज खाण्याचे बेत तुम्ही आखत आहात याची खात्री आहे मला. म्हणूनच अगदी घरच्या घरी तंदुरी कशी करावी या रेसिपीज सांगणार आहे. खरं सांगायचं तर हॉटेल्समध्ये कबाब जे बनवतात त्याला टेस्टी बनवणारे दोन घटक असतात. एक तर त्याचा मसाला त्याची टेस्ट व किती वेळ त्या पदार्थाला त्या मसाल्यात मुरवत ठेवलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोळशाच्या निखाऱ्यावर भाजणे. या दोन्ही गोष्टींनी कबाब एकदम टेस्टी होतात. घरी तंदुर जरी नसला तरी तुम्ही व्ज्ळ मध्ये करा किंवा आजकाल इलेक्ट्रिकल तंदूर आले आहेत ते पण वापरू शकता. मुख्य म्हणजे पार्टी वगैरे असेल तर घरच्या घरी तुम्हाला हे कबाब करता येतील. गरमागरम करून खा आणि खायला द्या!

मुर्ग अफगाणी कबाब
साहित्य : चिकन तुकडे बोनलेस (किंवा तंगडी आवडत असल्यास )- २५०ग्रॅम, दही - ५० ग्रॅम, मोहरी तेल - ५० ग्रॅम, आले-लसूण पेस्ट - ४/५ चमचे, मीठ - २ चिमूट, काळे मीठ - १ चमचा, जिरे पावडर - १ चमचा, गरम मसाला - १ चमचा, कसूरी मेथी - ) चमचा, व्हाईट पेपर - २ चिमूट, हळद - ) टी स्पून, केशर - ) ग्रॅम, काजू पेस्ट - ३/४ टी स्पून, फ्रेश क्रीम - ३ चमचे
कृती : चिकन तुकडे धुऊन घ्या. त्यानंतर त्याला िलबू, आल लसूण पेस्ट, मीठ लावून घ्या. नंतर राईचे तेल, आले-लसूण पेस्ट, मीठ, काळे मीठ, जिरा पावडर, गरम मसाला, काजू पेस्ट, चाट मसाला, कसूरी मेथी, व्हाईट पेपर, हळद, केशर व क्रीम यामध्ये टाकून त्याचा मसाला बनवून घ्या. आता चिकनचे पिस या तयार केलेल्या मसाल्यामध्ये टाकून लोखंडी सळीला लावून १५ मिनिटे भाजून घ्या किंवा लाकडी बांबू स्टिक्स्वर लावून कबाब रोस्ट करून घ्या. साधारणपणे २० मिनिटांत होईल. नंतर हे कबाब एका डिशमध्ये घेऊन, कांदा, लिंबू स्लाईस व पुदीना चटणीसोबत सव्र्ह करा.
टीप्स् : भाजताना मधून किमान दोन वेळा वरून थोडे थोडे बटर लावत जा. व्हाईट पेपर पावडर नसेल तरी चालेल.

पनीर हरियाली टिक्का
alt

साहित्य : पनीरचे चौकोनी कापलेले मोठे तुकडे- १०० ग्रॅम, बांधून घेतलेले घट्ट दही - १ वाटी, आले-लसूण पेस्ट -३/४ चमचे, मोहरी तेल - १०ग्रॅम, धने पावडर - १ चमचा, जिरे पावडर - १ चमचा, कसूरी मेथी - १ चमचा, गरम मसाला - १ चमचा, काळे मीठ - १ चमचा, चाट मसाला - १ चमचा,
हिरवी पेस्ट - कोथिंबीर - जुडी, पुदीना -२५/३० पाने, व हिरवी मिरची -२ हे सगळे एकत्र करून केलेली पेस्ट .
कृती : प्रथम दही घेऊन त्यात मोहरीचे तेल टाका. नंतर त्यामध्ये कोथिंबीर, पुदीना, आले-लसूण व मिरची पेस्ट, मीठ, काळे मीठ, गरम मसाला, चाट मसाला, कसूरी मेथी, धने पावडर, जिरे पावडर एकत्र करून त्याचा मसाला तयार करून घ्या. तयार मसाल्यामध्ये पनीरचे पिस टाकून त्याला हा मसाला लावून घ्या. मग मसाला लावलेले हे पनीरचे तुकडे ४ तास फ्रिजमध्ये ठेवा.
नंतर हे पिस लोखंडी सळीला लावून भाजून घ्या. किंवा लाकडी बांबू स्टीकला लावून एका प्लेटवर ठेवून (खाली थोड तेल लावा) व्ज्ळ मध्ये भाजून घ्या. नंतर एका डिशमध्ये ठेवून सव्र्ह करा. सोबत पुदीना चटणी, कांदा, लिंबू स्लाईस यांसोबत सव्र्ह करा.

तंदुरी अजवायनी पॉम्फ्रेट
alt
साहित्य : पापलेट- १ मध्यम आकाराचा, घट्ट दही- १०० ग्रॅम (१ छोटी वाटी) मोहरीचे तेल - ३० ग्रॅम, आले-लसूण-मिरची पेस्ट - ३ टी स्पून, मीठ-काळे मीठ -१ चिमूट, चमचा, जिरे पावडर - १ टी स्पून, धने पावडर - १ टी स्पून, गरम मसाला, चाट मसाला, लाल मिरची पावडर, िलबू, काश्मिरी लाल मिरचीची पेस्ट, भाजून घेतलेले बेसन, ओवा                                          
कृती : पापलेटला दोन्ही बाजूने मधून चिरा मारणे. साफ करून धुऊन एका भांडय़ात घ्या.
त्यानंतर त्याला मीठ, लिंबू, आले-लसूण पेस्ट लावून ठेवा. (२०-२५ मिनिटे)
मग बांधून, पाणी काढून घेतलेले घट्ट दही, राईचे तेल, काळे मीठ, आले-लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला, ओवा, चाट मसाला एकत्र करून त्याचा घट्टसर मसाला तयार करून घ्या. आता हा मसाला पापलेटला सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्या. आता ट्रेला खालून तेल लावून पापलेट ठेवून व्ज्ळ मध्ये २० मिनिटे १८० त्ब वर रोस्ट करा. (खाली असल्यास सिल्व्हर फॉईलचा तुकडा ठेवा म्हणजे चिकटणार नाही) नंतर एका डिशमध्ये ही पॉम्फ्रेट ठेवून, कांदा, लिंबू व पुदीना चटणीसोबत सव्र्ह करा. ओव्यामुळे मस्त फ्लेवर येतो.
टीप्स् : शेपटीच्या भागाला सिल्व्हर फॉईलचा तुकडा असल्यास गुंडाळा म्हणजे पॉम्फ्रेट रोस्ट हात असताना शेपटी जळणार नाही. (जास्त काळी होणार नाही. आम्ही हॉटेलमध्ये असेच करतो.)
भाजताना वरून थोडे बटर लावत जा.