शॉप टिल यू ड्रॉप Print

टीम व्हिवा , शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२

आता गार्नियाचे थ्री इन वन!
फेअरनेस क्रिमची क्रेझ ही फार मोठय़ा प्रमाणावर वाढू लागलेली आहे. केवळ मुलींमध्येच नाही तर अनेक मुलांनाही फेअरनेस क्रिमचे आकर्षण वाटू लागलेलं आहे. खास यावर गार्नियाचे नवीन फेअरनेस क्रीम बाजारात आणलेलं आहे. इतर क्रिमपेक्षा याने लवकरच इफेक्ट होत असल्याचा दावा कंपनीने केलेला आहे. त्यामुळे आता फेअरनेस अवघ्या काही दिवसातच मिळेल.

‘टाटा स्वच्छ ला विटा’ चे आगमन
गृहिणींना घरामध्ये कितीही भांडी किंवा डबे असतील तर ते कमीच वाटतात. खास टाटाने आता गृहिणींसाठी नवीन मॉडेल्स आणली आहेत. हे कंटनेर्स दिसायलाही आकर्षक असून, यामध्ये सनसेट रोज, स्प्रिंग ग्रीन रंगआहेत. हे मॉडेल म्हणजे एक अनब्रेकेबल कंटेनर आहे. त्यात आपण धान्य किंवा खाद्यपदार्थ ठेवू शकतो. याला वंडर पॅक असे नाव देण्यात आले आहे. या मॉडेलमध्ये अत्याधुनिक कार्टेज बसवण्यात आले आहे. हे कार्टेज अपारदर्शक आहे.

मोइरा कलेक्शन
गीतांजलीने ‘मोइरा’ हे नवीन कलेक्शन लाँच केले आहे. यामध्ये हिऱ्यांच्या आकर्षक कर्णफुलांचा समावेश आहे. पारंपरिक दागिन्यांना दिलेली नव्या फॅशनची  जोड आपल्याला या कलेक्शनमध्ये पाहायला मिळते. मोइरा हे ग्रीक पुराणातील नाव या कलेक्शनला देण्यात आले आहे.

न्यूट्रोजीनाच्या क्लिन्झर

चेहरा धुण्यासाठी अनेक उत्पादनं बाजारात आलेली आहेत. यामध्ये आता एक नवं नाव आपल्यासमोर येतंय. त्वचा उत्तम राहावी म्हणून न्यूट्रोजीनाने  नवीन वेव्ह पावर क्लिन्झर बाजारात आणला आहे. हा क्लिन्झर खोलवर जाउन त्वचेची स्वच्छता करतो. त्यामुळे त्वचा नितळ आणि मुलायम बनते. याची प्रचिती क्लिन्झरच्या एका वापरातच येईल, असा कंपनीचा दावा आहे.

रिमेडिजचे इलोवा सॅनिटायझर.
अम्रा रिमेडिजने ‘इलावो टॉयलेट सॅनिटायझर’ लाँच केले आहे. या सॅनिटायझरमध्ये विविध फ्रॅगरन्स उपलब्ध आहेत. जीवाणूंचा नाश करण्याची यामध्ये उत्तम क्षमता असल्यामुळे हे वापरण्यास सर्वात उत्तम आहे.
संपादन सहाय्य : प्रभा कुडके  /  डिझाइन : संदेश पाटील