आयएनटी.. एक चळवळ Print

शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

तरुणाईतील अभिनय, दिग्दर्शन, लेखन, तंत्रज्ञ, प्रकाशयोजना, नपथ्य वगरे कलागुणांना सादर करण्यासाठी वाव मिळवून देणारी आयएनटी ही नाटकवेडय़ांसाठी केवळ स्पर्धा नसून ती एक चळवळच आहे. 'एकांकिका' स्पर्धा म्हणजे उत्साह, उमेदीचं कलासक्त रूप. ईर्षां, चढाओढ, द्वेष, नराश्य, टोकाचा आनंद यांचा अफलातून संयोग असलेला समूह.. आणि याच समूहाला रंगभूमीवर स्थिरावण्याआधीची पात्रता फेरी असते ती म्हणजे 'आंतरमहाविद्यालीन एकांकिका स्पर्धा '.
प्रियांका पावसकर
नवे विचार, नव्या कल्पना, नवा दृष्टिकोन, नवी उमेद आणि सामाजिक बांधीलकीची जाणीव असलेल्या तरुण कलाप्रेमींना योग्य असा मंच मिळवून देणाऱ्या इंडियन नॅशनल थिएटर आयोजित कै. प्रवीण जोशी आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पध्रेचा आज पडदा उघडेल. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून अमुक संघ सादर करत आहे  एकांकिका असा आवाज आयएनटीच्या निमित्ताने तरुणाईला पुन्हा एकदा ऐकायला मिळाल्यानंतर प्रेक्षागृहात तळ ठोकेल तो केवळ जल्लोष आणि जल्लोषच..तरुणाईतील अभिनय, दिग्दर्शन, लेखन, तंत्रज्ञ, प्रकाशयोजना, नपथ्य वगरे कलागुणांना सादर करण्यासाठी वाव मिळवून देणारी आयएनटी ही नाटकवेडय़ांसाठी केवळ स्पर्धा नसून ती एक चळवळच आहे. 'एकांकिका' स्पर्धा म्हणजे उत्साह, उमेदीचं कलासक्त रूप. ईर्षां, चढाओढ, द्वेष, नराश्य, टोकाचा आनंद यांचा अफलातून संयोग असलेला समूह..आणि याच समूहाला रंगभूमीवर स्थिरावण्याआधीची पात्रता फेरी असते ती म्हणजे 'आंतरमहाविद्यालीन एकांकिका स्पर्धा '. विशेष म्हणजे आयएनटीमार्फत राबवण्यात येणाऱ्या एकांकिका स्पध्रेने तरुणांना गेली कित्येक र्वष झपाटून टाकलंय.
   महाविद्यालीन विश्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी आयएनटी एकांकिका स्पर्धा यंदा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वरच्या सहयोगाने होईल. ५ ते ११ ऑक्टोबर दरम्यान आयएनटीची तालीम फेरी होणार असून त्यातून निवड होणाऱ्या तीस एकांकिकांची दुसरी फेरी १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान होईल. यातून निवडलेल्या पाच एकांकिकांची अंतिम फेरी १७ ऑक्टोबरला होणार आहे. गेल्या वर्षी ३३ महाविद्यालयांचा समावेश असणाऱ्या या स्पध्रेत यंदाच्या वर्षी ४४ महाविद्यालयांनी भाग घेतला आहे. यंदा मुंबईतील कॉलेजांव्यतिरिक्त  सिंधुदुर्ग येथील 'कला वाणिज्य' तर चिपळूण येथील 'डी.बी.जे' महाविद्यालय यांचाही स्पध्रेत समावेश असेल.   नवीन दिग्दर्शक, लेखक, अभिनेता, अभिनेत्री एवढाच नाही तर उत्कृष्ट तंत्रज्ञ, नपथ्यकार इत्यादी घडवण्यात आयएनटी एकांकिका स्पर्धाचा मोठा हात आहे. लेखन, दिग्दर्शन वगरे क्षेत्रांत आज तोऱ्याने मिरवणारे अनेक दिग्गज रंगकर्मी रुपेरी पडद्याचा भाग होऊ शकले ते केवळ आयएनटीमुळेच.आज हा प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे. आता यापुढेही आयएनटीमार्फत सादर होणाऱ्या एकांकिका घडवू पाहत आहेत उभरत्या रंगकर्मीना. आजवर आयएनटीच्या रंगमंचावर सादर करण्यात आलेल्या या एकांकिका त्यांचा विषय, मांडणी आणि सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून इतक्या लाजवाब होत्या की त्या निर्मात्यांना सेलेबल प्रोडक्ट वाटू लागल्या. आणि मग विविध संस्थांमार्फत चक्क या एकांकिकांचे नाटय़गृहात व्यावसायिक प्रयोग लावण्यात आले. काही निर्मात्यांनी पुढाकार घेऊन एकांकिकांची व्यावसायिक नाटकं केली आणि एकांकिकांना ग्लॅमर प्राप्त झालं. एकांकिका लिहिणारे लेखक, दिग्दर्शक दोघांनाही या मंचाहून नवी दिशा प्राप्त झाली. हौशी पातळीवर केलेल्या कलाकृतीचं व्यावसायिक रंगभूमीने दिलखुलासपणे स्वागत केलं. हे सारं काही शक्य झालं ते केवळ इंडियन नॅशनल थिएटरच्या प्लॅटफॉर्ममुळेच.
   ती फुलराणी, बटाटय़ाची चाळ, कोंडी, धुम्मस, गुरू, करार, बे दुणे पाच, अखेर तू येशीलच, झीन्न, कन्यादान अशा दर्जेदार नाटकांची निर्मिती करून आयएनटीने मराठी रंगभूमीवर अनेक विक्रम केले. भक्ती बर्वे, पु.ल.देशपांडे, श्रीराम लागू, सतीश दुभाषी, सदाशिव अमरापूरकर, शफी इनामदार, स्मिता पाटील, प्रिया तेंडुलकर, प्रवीण जोशी, आत्माराम भेंडे, बबन प्रभू अशी अनेक नावं आयएनटीशी जोडली गेलीएत. केवळ मराठीतच नाही तर िहदी सिनेसृष्टीतही ज्यांची नावं आदराने घेतली जातात अशा दिग्गज नटांनाही त्यांच्या उमेदीच्या काळात आयएनटीच्याच  रंगमंचाने आधार दिला. केवळ बहुभाषिक नाटय़निर्मितीएवढंच आयएनटीने कार्यक्षेत्र नं ठेवता १९७९ साली महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील लोककलांचं संशोधन करून त्याचं संवर्धन करण्याकरता पाहिलं पाऊल उचललं.
  गेल्या ३८ वर्षांत आयएनटीचं नाव प्रत्येक महाविद्यालयात सर्वोतोमुखी झालं ते इतक्या वर्षांच्या नाटकासाठी चाललेल्या चळवळीमुळे आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिरत्या चषकामुळे. या चषकाने अनेकांना िझग आणली, लिहितं केलं, वेडं केलं. एकांकिका गाजवणारे केदार िशदे, भरत जाधव, श्रेयस तळपदे, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर,पंढरीनाथ कांबळे,अदिती सारंगधर,देवेंद्र पेम,संतोष पवार,स्पृहा जोशी,नितीन जाधव, अंबर हडप, हृषिकेश कोळी,अमोल भोर, प्रियदर्शन जाधव, सुनील हरिश्चंद्र वगरेसारखे प्रथितयश रंगकर्मी एकांकिका स्पर्धातून मराठी रंगभूमीला लाभले आहेत.
येथे सहभागी प्रत्येक कलाकाराला वाटतं आम्हाला दुनियेत ओळखावं, आम्हीही कलेचे पुजारी आहोत, आमचंही नाव व्हावं आणि याच वेडाने झपाटलेले नाटकप्रेमी हे वाटेत येणाऱ्या वादळांना तोंड देत, दगडधोंडे पायदळी तुडवत, स्वत:च्या भावनांचा बळी देत मार्गक्रमण करत आहेत. कधी कर्जाचे ओझे, कधी या पुण्यवान इंडस्ट्रीला पापी म्हणून हिणवणाऱ्यांचा अडसर तर कधी कलेचा बाजार या अशा असंख्य गोष्टी पाहत, अनुभवत सुरू असलेला यांचा आयएनटीपासून ते आयएनटीपर्यंतचा प्रवास म्हणजे या नाटकप्रेमींसाठी एक चळवळच..