टेस्टी टेस्टी : मेड इन चायना Print

शेफ देवव्रत जातेगावकर , शुक्रवार , १२ ऑक्टोबर २०१२

एखाद्या वस्तूवर ‘मेड इन चायना’ चं लेबल बघितलं की जरी आपली प्रतिक्रिया ‘नाही’ असली तरी चायनीज फूड म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं ते असतंच इतकं टेस्टी. या आठवडय़ात मी आणला आहे एक मस्त चायनीज मेन्यू. चिकनचं स्टार्टर, नूडल्स आणि स्टारफ्राय व्हेजिटेबल करताना दोनतीन गोष्टी लक्षात ठेवा. भाज्या थोडय़ा कच्च्या हव्यात. पूर्ण शिजवू नका. दाताखाली लागायला हव्यात. नूडल्स राइस बनवताना कढाई व तेल खुप तापवून घ्या व मगच इतर साहित्य टाका. म्हणजे स्मोकी फेवर येतो व तिसरी गोष्ट म्हणजे मीठ जपून टाका, कारण सॉसमध्ये व सीझनिंगमध्ये मीठ असते.

व्हेज हुनान नूडल्स
साहित्य : चिरलेला कोबी - १ वाटी, हिरवी ढोबळी मिरची - १ वाटी, पिवळी ढोबळी मिरची - १ वाटी, कांदापात (हिरवी) - २, गाजर - १, उकडून घेतलेले नूडल्स - १ पॅकेट, तेल - २ चमचे, सीझनिंग पावडर क्युब्स - १ चमचा, साखर, सफेद मिरपूड, सोया सॉस - १ चमचा,  मिरची पेस्ट - २ चमचे,  स्टारफुल पावडर, सोया सॉस - १ चमचा,  चवीनुसार मीठ, व्हिनेगर - २/३ थेंब.
कृती : प्रथम कढईमध्ये तेल घेऊन त्यात लाल मिरची  पेस्ट टाकून परतून घ्या. त्यानंतर सर्व भाज्या परतवून घ्या. नंतर त्यामध्ये उकडून घेतलेले नूडल्स, सीझनिंग पावडर, सफेद मिरपूड, सोया सॉस, मिरची पेस्ट, स्टारफुल पावडर, चिरलेली कांदापात टाका. २/३ थेंब व्हिनेगर टाका. चवीपुरते मीठ टाकून मिक्स करून घ्या. नंतर हे नूडल्स डिशमध्ये घेऊन सेझवान सॉससोबत सव्‍‌र्ह करा.

डाइस चिकन पेपर गार्लिक ड्राय
साहित्य : चिकनचे बोनलेस छोटे तुकडे - २ वाटी, सिमला मिरची (हिरवी, लाल, पिवळी) कांदापात - २, काळी मिरी - १ चिमूट, लसूण बारीक चिरलेला - ८/१० पाकळ्या, आलं चिरलेले - २ टी स्पून, कांदा -१, मिरची बारीक चिरलेली - २, सोया सॉस, अंड - १, कॉर्नफ्लॉवर- ३ टी स्पून, मदा - १ टी स्पून, मीठ चवीनुसार, सीझनिंग क्युब्स,  पांढरी मिरपूड - २ चिमूट, साखर - १ टी स्पून.
कृती : प्रथम चिकनला, अंडं मदा, कॉर्नफ्लॉवर, पांढरी मिरी पावडर, थोडी सीझनिंग पावडर एकत्र करून फ्राय करा.  त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. त्यामध्ये आलं, लसूण, कांदा, काळी मिरी पावडर, हिरवी मिरची फ्राय करून घ्या. आता त्यामध्ये कांदा, लाल-हिरवी-पिवळी सिमला मिरची व सोया सॉस टाकून त्याला छान परतून घ्या. मग त्यामध्ये (५० मि.ली.) अर्धी वाटी पाणी टाका व त्यामध्ये फ्राय केलेले चिकन टाका. मग त्यामध्ये सीझनिंग पावडर, साखर  व चवीपुरते मीठ टाकावे. किंचित पाण्यात घोळलेले कॉर्नफ्लॉवर टाकावे म्हणजे छान चिकनवर कोटिंग होईल.
नंतर हे सर्व एका डिशमध्ये घेऊन, त्यामध्ये कांदापात चॉप कन गाíनिशग करून सव्‍‌र्ह करा.
* आपण सोया सॉस व सीझनिंग वापरतो आहोत. दोन्हीही गोष्टींत मीठ असतं. म्हणून वरून मीठ घालताना जरा जपून. नाहीतर सूप सॉल्टी लागतं.

व्हेज इन बटर गार्लिक सॉस !
साहित्य : ब्रोकोली, बेबीकॉर्न, झुकीनी, चायनीज कॅबेज, घेवडा, फ्लॉवर, गाजर या सर्व भाज्यांचे तुकडे वाफवून किंवा उकडून घेतलेले - साधारणपणे एकत्र करुन ३ वाटय़ा व्हायला हवेत, बटर- २ टीस्पून, लसूण बारीक चिरलेली -  १०/१२ पाकळ्या, सीझनिंग पावडर, साखर, सफेद मिरी पावडर, कॉर्नफ्लॉवर - २ चमचे,  
कृती : कढईमध्ये बटर गरम करून लसूण टाका. मग ढोबळी मिरची टाकून परतून घ्या. नंतर त्यामध्ये  १ वाटी पाणी टाका. उकळी येऊ द्या.  मग त्यामध्ये ब्रोकोली, बेबीकॉर्न, जुगनी, भोपळी मिरची, चायनीज कॅबेज, सीझिनग पावडर, साखर, सफेद मिरी पावडर, कॉर्नफ्लॉवर थोडय़ा २ चमचे पाण्यात घोळून मिक्स करा. सगळा सॉस छान भाज्यांना कोट झाला पाहिजे. नंतर हे सर्व एका डिशमध्ये घेऊन, तळलेल्या लसूण स्लाइसचे गाíनिशग करून सव्‍‌र्ह करा.
*  भाज्या खूप जास्ती उकडू नका. जरा कच्च्या राहायला हव्यात.
*  तुमच्या आवडीप्रमाणे व उपलब्धतेप्रमाणे भाज्या वापरा