शॉप टिल यू ड्रॉप Print

टीम व्हिवा , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सेंट्रलचे विंटर कलेक्शन
प्रत्येक सीझन हा स्वत:बरोबर त्याची खासियत आणतो. थंडीत कुठले कपडे घालावेत हा प्रश्न पडला असेल तर सेंट्रलचे नवीन विंटर कलेक्शन बाजारात दाखल झाले आहे. यामध्ये खास कॉलेजगोइंग क्राऊडसाठी कलेक्शन आणलेले आहे. केवळ कपडेच नाही तर अ‍ॅक्सेसरीज आणि त्याला मॅचिंग पर्सेस असे कलेक्शन एकाच छताखाली तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा आता या सीझनमधील वॉर्डरोब अपडेट करायची चिंता मिटली असे म्हणायला हरकत नाही.

पॅराशूटचे बॉडी लोशन
थंडीत त्वचेची काळजी घेण्यासाठी पॅराशूटने खास बॉडी लोशन आणलेले आहे. यामध्ये दोन नवे प्रकार असून यामुळे त्वचा कोरडी पडत नाही, असा दावा कंपनीने केला आहे. कोकोनट मिल्क असलेले हे बॉडी लोशन दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ड्राय स्किन आणि एक्स्ट्रा ड्राय स्किनसाठी खास हे लोशन असल्याने आता तुम्हाला निवड करणे अधिक सोप्पे होईल.

क्लेरेचे कोका बटर
थंडीत त्वचा कोरडी पडणे हा नित्याचाच भाग आहे. पण अनेकदा बॉडी लोशन लावल्याने त्वचा चिकचिकीत होते. यावर क्लेरेने बाजारात नवीन एक बॉडी क्रीम आणले आहे. यामध्ये असलेल्या कोका बटरमुळे तुमच्या त्वचेला एक अनोखा तजेला येतो. तसेच यामुळे त्वचेचे मॉइश्चरायजर टिकण्यासाठीही मदत होते.

न्यू सफोला मुसली
alt
सकाळी उठून नाष्ता करून ऑफिसला जाणं म्हणजे भव्यदिव्य काम करणं असं वाटत असतं. सकाळी उठल्यावर काहीतरी खायचं आणि ऑफिसला जायचं हा अनेकांचा दिनक्रम. पण हे खाणं पौष्टिक नसलं की मग आरोग्याच्या असंख्य तक्रारी सुरू होतात. यावरच एक उपाय म्हणून न्यू सफोला मुसली बाजारात दाखल झालेलं आहे. सफोला मुसलीमध्ये नैसर्गिक पोषणमूल्यांचा साठा असलेल्या धान्यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे यामध्ये शरीराला आवश्यक असा ओट्स हा प्रमुख घटक आहे. या मुसलीमध्ये तीन प्रकार आहेत. नट्टी क्रंच, लाईट एन नॅचरल, फ्रुट रश तुम्हाला हवा तो प्रकार निवडा आणि हेल्दी राहा.