डहाणूकर रॉक्स… Print

alt

शुक्रवार , २६ ऑक्टोबर २०१२
आयएनटी म्हणजे  मराठी रंगभूमीला उत्कृष्ट कलाकार मिळवून देणारे एक प्लॅटफॉर्म.  सर्वच कलाकार या स्पध्रेची अतुरतेने वाट बघत असतात.  यंदाही असेच झाले.  ५ ऑक्टोबरला आयएनटी स्पध्रेला सुरुवात झाली. तब्बल ४४ महाविद्यालयांचा सहभाग असलेल्या या स्पध्रेत अंतिम फेरीत बाजी मारली ती डहाणूकर महाविद्यालयाच्या ‘बंध नायलॉन’चे या एकांकिकेने. उत्कृष्ट नेपथ्य, प्रकाशयोजना व विनोदांनी खिळवून ठेवणाऱ्या या एकांकिकेने आयएनटीचा अंतिम सोहळा गाजवला.  डहाणूकर कॉलेजनंतर आयएनटीच्या अंतिम सोहळ्यात दिसून आले ते कीर्ता रॉकस. तब्बल ९ वर्षांनंतर कीर्ती कॉलेजला द्वितीय उत्कृष्ट एकांकिकेचा मान मिळाला. 

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मानही कीर्ती कॉलेजच्या तेजस्वी सावंत हिने पटकविला. आयएनटीमध्ये तृतीय सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली ती सीएचएम कॉलेजची.
याच एकांकिकेला श्रीपाद देशपांडे यांना उत्कृष्ट लेखकाचा मान मिळाला.  यंदा आयएनटीमध्ये जरी सर्वोत्कृष्ट एकांकिकेच्या मानासाठी रुईया कॉलेज पात्र ठरले नसले तरी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान रुईया कॉलेजच्या एकांकिकेतील रामचंद्र गावकर यांस मिळाला.  आयएनटीच्या अंतिम फेरीतील पाचही एकांकिका एकमेकांना तोडीसतोड होत्या, परंतु यंदा आयएनटीमध्ये दिसून आले ते फक्त आणि फक्त डहाणूकर रॉक्स.

alt

आयएनटीमध्ये बक्षीस मिळवणे म्हणजे एकांकिका करणाऱ्यांसाठी ऑस्कर. प्रत्येक रंगकर्मी प्रमाणे माझे स्वप्न होते की आयएनटीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा मान मिळावा आणि तो मी मिळवलाच, हे यश माझ्या एकटय़ाचे नसून संपूर्ण टीमचे आहे. आयएनटीचा हा अनुभव माझ्यासाठी एक न विसरणारी आठवण राहील.
रामचंद्र गावकर (सर्वोत्कृष्ट अभिनेता), रुईया  कॉलेज.

आयएनटी स्पध्रेच्या अंतिम फेरीतील सर्वच एकांकिका जबरदस्त होत्या आणि त्यातसुद्धा कीर्ती कॉलेजने मिळवलेला द्वितीय सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा मान खरंच वाखाणण्याजोगाच. माजी विद्यार्थी व प्राध्यापक मगरे सर यांच्या पाठिब्यांमुळे तब्बल नऊ वर्षांनंतर कीर्ती कॉलेजला हा मान मिळाला. त्यामुळे खूपच मस्त वाटतंय.
- रोहित माने, कीर्ती कॉलेज

आयएनटीचे माझे हे पहिलेच वर्ष आणि पहिल्याच वर्षी मला मिळालेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान माझ्यासाठी कधीच न विसरता येणारा क्षण आहे.  माझ्या या यशामागे माझ्या बरोबरच संपूर्ण कॉलेज टीमचाही तेवढाच हात आहे. लेखक व दिग्दर्शक यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी खरा करून दाखवला. त्यामुळे मी खूप खूश आहे.
- तेजश्री सावंत (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री),
कीर्ती कॉलेज.
संकलन- निशांत दप्तरदार