टेस्टी टेस्टी : टेस्टी डेझर्ट मुस Print

  alt

शेफ देवव्रत जातेगावकर , शुक्रवार , २६ ऑक्टोबर २०१२
प्रत्येक डिशची व डेझर्टची सुबक सजावट हा ट्रेंड फ्रेंच खाद्यसंस्कृतीतून आला आहे आणि मुस हा डेझर्टचा प्रकारही त्यांचाच. साधारणपणे यामध्ये अंडय़ाचा पांढरा भाग फेटून, क्रीम फेटतांना त्यामध्ये चॉकलेट, फ्रूटस् वगैरे टाकून हे बनवले जातात. फेटल्यामुळे छान हवा शिरून हे मुसेस लाइट होतात. आमच्या हॉटेलमध्ये एगलेस डेझर्टची खूप डीमांड असते. या आठवडय़ात आपण करणार आहोत मस्त एगलेस मुस. हे तर कराच पण सजावटीवर थोडी मेहनत घ्या, बरे का. जवाहिऱ्याकडे तुम्ही गेलात तर तो मोती नुसतेच हातावर काढून देत नाही तर तो आलिशान गुबगुबीत डबीत ठेवून दाखवतो, म्हणजे ते मोती अजून मौल्यवान वाटतात. तुम्हीपण आपल्या पदार्थाची किंमत सजावटीने वाढवा! पटले ना!alt

alt
बनाना मुस

साहित्य : कस्टर्ड पावडर- ४० ग्रॅम (३ टी स्पून), दूध- ५०० मि.ली., साखर- १०० ग्रॅम, बनाना प्युरी- २५० ग्रॅम (कुस्करलेली केळी), मध- ३ चमचे, व्हॅनिला इसेन्स- ३/४ ड्रॉप, व्हीप क्रिम (फेटून घेतलेली)- २५० ग्रॅम, पिठी साखर- १०० गॅम.
इतर साहित्य :  बनाना क्रश किंवा इसेन्स, केळ्याचे काप- २ केळी.
कृती : एका भांडय़ामध्ये साखर, दूध आणि कस्टर्ड पावडर एकत्र करून घ्या व तापवून त्याचे कस्टर्ड तयार करून घ्या. हे कस्टर्ड थंड झाल्यावर मिक्सरच्या भांडय़ात टाका. आता त्यामध्ये बनाना क्रश (असल्यास), बनाना इसेंस (असल्यास), मध, पिठी साखर (कुस्करलेली केळी)आणि फेटून घेतलेले क्रीम घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. आता काचेच्या छोटय़ा बाऊलमध्ये फेटून घेतलेले क्रीम एक एक चमचा टाका. केळीचे काप क्रीमवर ठेवा.
आता मिक्सरमधील मिश्रण वर ओता. आता हे मुस फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा. सेट झाल्यावर वरून फेटलेले क्रीम, पुदिना पान व केळीचे तुकडे वापरून सजावट करा.    

alt
alt
पपया मुस

साहित्य : कस्टर्ड पावडर - ४० ग्रॅम (३ टी स्पून), दूध- ५०० मि.ली., साखर- १०० ग्रॅम, पपया प्युरी (मिक्सरमधून काढून घ्या)- २५० ग्रॅम, मध- ३ चमचे, व्हॅनिला इसेन्स- ३/४ ड्रॉप, लेमन- १, फेटून घेतलेले क्रीम- २५० ग्रॅम, पिठी साखर- १०० गॅम.
इतर साहित्य : पपया इसेन्स (असल्यास, नसले तरी चालेल), पपयाचे तुकडे- १ वाटी                    
कृती : एका भांडय़ामध्ये साखर, दूध आणि कस्टर्ड पावडर एकत्र करून घ्या व तापवून त्याचे घट्ट कस्टर्ड तयार करून घ्या. हे कस्टर्ड थंड झाल्यावर मिक्सरच्या भांडय़ात टाका. आता त्यामध्ये पपया क्रश, पपया इसेंस, मध, पिठी साखर आणि फेटून घेतलेले क्रीम घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. आता काचेच्या छोटय़ा बाऊलमध्ये पपयाची प्युरी एक एक चमचा टाका. आता पपयाचे छोटे तुकडे प्युरीवर टाका. आता मिक्सरमधील मिश्रण वर ओता. आता हे मुस फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा. सेट झाल्यावर वरून पपयाचे तुकडे टाकून सव्‍‌र्ह करा.   

alt
डे अ‍ॅण्ड नाईट मूस

साहित्य : कस्टर्ड पावडर- ४० ग्रॅम (३/४ चमचे), दूध- ५०० मि.ली., साखर- १०० ग्रॅम, व्हॅनिला इसेन्स- ३/४ ड्रॉप,  क्रीम (फेटून घेतलेली)- २५० ग्रॅम, डार्क चॉकलेट- १०० ग्रॅम (१ कप दुधाबरोबर गरम करून वितळवून घेतलेले).
इतर साहित्य : व्हॅनिला इसेन्स.       
कृती :  एका भांडय़ामध्ये साखर, दूध आणि कस्टर्ड पावडर एकत्र करून घ्या व तापवून त्याच कस्टर्ड तयार करून घ्या. हे कस्टर्ड थंड झाल्यावर मिक्सरच्या भांडय़ात टाकावे व क्रीम टाकून फेटून घ्यावे. त्यामधील अध्रे मिश्रण बाजूला काढून ठेवावे व अध्र्या मिश्रणामध्ये डार्क चॉकलेट घालून मिक्स करावे. आता काचेच्या बाऊलमध्ये पांढरे मिश्रण व चॉकलेट मिश्रण अध्रे-अध्रे दोन बाजूंनी टाकावे. वरून चॉकलेट फ्लेक्स गाíनश करून मिश्रण सेट करून सव्‍‌र्ह करावे.