शॉप टिल यू ड्रॉप Print

टीम व्हिवा , शुक्रवार , २ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

alt


नोटनदासचे अनोखे दागिने

स्त्रिया आणि दागिने हे एक अतूट नातं. त्यातल्या त्यात डायमंड म्हटल्यावर तर मग काही विचारता सोय नाही. नोटनदासने खास डायमंडचे नवे दागिने बाजारात आणलेले आहेत. खास डायमंडचे हे दागिने पार्टी वेअर असल्याने प्रत्येकीला आवडतील असेच आहेत.

alt

हिमालयाची दिवाळी भेट

हिमालयाने दिवाळीच्या आनंदात भर घालणारी खास ऑफर आणली आहे. त्यात फेअरनेस पॅक आणि प्युअर स्किन पॅक असे दोन विशेष पॅक आहेत. यातील फेअरनेस पॅकमध्ये हिमालयाची फेअरनेस क्रीम, स्क्रब, फेअरनेस फेस पॅक, फेस वॉश यांचा समावेश आहे तर प्युअर स्किन पॅकमध्ये निम फेस वॉश, निम पॅक, निम स्क्रब, जनटल रिफ्रेशिंग टोनर असणार आहे. तुमच्या जवळच्या मंडळींना दिवाळीमध्ये हे पॅक भेट देता येतील.

alt

विनेगरचे फॅशनेबल कलेक्शन

फॅशन आणि आपण यांचा जवळचा संबंध. खासकरून कॉलेजगोईंग तरूणांसाठी फॅशन म्हणजे जीव की प्राण. कुठली नवी फॅशन बाजारात आली आहे याकडे त्यांचे सतत लक्ष असते. खास ही तरूणांची गरज नजरेसमोर ठेवून विनेगरने नावीन्यपूर्ण आणि आकर्षक कलेक्शन आणले आहे. यामध्ये जॅकेट्स, मीडी, मीनी, रॅप राऊंड असे विविध प्रकार आहेत.


हायपरसिटीचे फेस्टिव्ह कलेक्शन

सण जवळ येणार म्हटल्यावर घराचे रंगरूपही बदलण्याकडे आपला कल असतो. घरातील काही खास वस्तूंमध्ये थोडा बदल केला तरी घराचा लूक एकदम पालटतो. खास हायपरसिटीने काही नवीन फेस्टिव्ह कलेक्शन आणलेलं आहे. यामध्ये बेडशिट, तक्के, गिफ्ट देण्यासाठी असणाऱ्या वस्तू आहेत. तुमच्या सणाचा आनंद द्विगुणित करणाऱ्या अशा या वस्तू आहेत. या वस्तू पाहिल्यावर गिफ्ट काय द्यायचे हा प्रश्न नक्कीच सुटेल असं म्हणायला हरकत नाही.

संपादन सहाय्य : प्रभा कुडके / डिझाइन : संदेश पाटील