तरूणाईचा ‘उंबरठा’ Print

alt

शुक्रवार , २ नोव्हेंबर २०१२
एकांकिका स्पर्धा म्हणजे कलाकाराला त्याची कला दाखविण्याचा एक प्लॅटफॉर्मच. आय.एन.टी.मधील धमाकेदार एकांकिकेच्या थरारानंतर आता सर्व कलाकारांचे व रंगप्रेमींचे लक्ष लागले आहे ते उत्कर्ष सेवा मंडळ यांच्या ‘उंबरठा’ या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पध्रेकडे.. एकांकिका स्पध्रेत आपल्याला आलेले वाईट अनुभव, निकालातील फेरबदल अशा सगळ्या कारणांमुळे कलाकारांची निराशा होते व तो रंगभूमीपासून दुरावतो. अशाच कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी उत्कर्ष सेवा मंडळाने या खुल्या एकांकिका स्पध्रेची २००२ साली सुरुवात केली. यंदा या स्पध्रेचे महत्त्व म्हणजे ही स्पर्धा दशक महोत्सवी वर्षांत पदार्पण करत आहे. स्व. श्रीकांतजी ठाकरे यांच्या स्मरणार्थ या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पध्रेची प्राथमिक फेरी ९, १०, ११ नोव्हेंबरला बाळ दंडवते सभागृहात होणार असून १० डिसेंबरला प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिर येथे या स्पध्रेची अंतिम फेरी रंगणार आहे. या alt
स्पध्रेतील प्राथमिक फेरीत ‘पडते पाऊल’, ‘अर्थ निर्थ’, ‘तु काय.. मी काय ?’, ‘द एॅनालिसिस’, ‘स्लाइस ऑफ द लाइफ’, ‘भक्ष’, ‘तथास्तू’, ‘ऑपरेशन अर्थ’, ‘मनमोहन आणि ‘ती’..’, टाइम प्लीज’, ‘केंडी’, ‘माणुसकीचे स्मशान’, ‘लाडी’, ‘फ्लॅश’, ‘ब्लाइंड फोल्ड’, ‘दॅटस् ऑल’, ‘मंथन’, ‘माजूरडय़ा चिमणीचं बायपास’, ‘एकूट समूह’, ‘संभ्रम’, ‘संगीत थॉमस आख्यान’, ‘लवकरच रंगभूमीवर’, ‘४९ नॉट आऊट’, ‘साकव’, ‘बा’, ‘विठ्ठल..विठ्ठल’, ‘डक वर्थ लुईस’, ‘नटरंग्या’, ‘कम्फर्ट झोन’, ‘एक प्रयोग संधीचा’, ‘टू बी ऑर नॉट टू बी’, ‘सुदामाचे पोहे’, ‘अंत्योदय’, ‘घेवून टाक’, ‘द जजमेंट डे’, ‘राक्षस’, ‘तांडव तळ’, ‘सीसॉ’, ‘द ब्लाइन्ड वर्डस’ या एकांकिकांचा समावेश असणार आहे. यंदाच्या वर्षी आय.एन.टी.च्या अंतिम फेरीत पोहचलेल्या ‘एकूट समूह’, ‘स्लाइस ऑफ द लाइफ’ व ‘लवकरच रंगभूमीवर’ या एकांकिकांकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. या एकांकिका स्पध्रेचे प्रथम पारितोषिक रु. १०,०००, द्वितीय पारितोषिक रु. ७००० व तृतीय पारितोषिक रु. ५००० असणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यांना प्रत्येकी १२०० रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. या स्पध्रेचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे प्राथमिक फेरीतील प्रत्येक प्रयोगानंतर त्या त्या संस्थेला वा कॉलेजला त्याच्या चुका सुधारण्यासाठी परीक्षकांसोबत चर्चा करू दिली जाते. सो आता लेटस् रेडी फॉर ‘उंबरठा २०१२’.

alt
उत्कर्ष सेवा मंडळ आयोजित स्व. श्रीकांतजी ठाकरे यांच्या स्मरणार्थ खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘उंबरठा’चे यंदाचे १० वे वर्ष. ‘उंबरठा’ या एकांकिका स्पर्धेच्या आयोजनाचा उगम हा आम्हाला आलेल्या वाईट अनुभवातूनच झाला. गेली २५ वष्रे आम्ही रंगभूमीवर बालनाटय़, एकांकिका व तसेच राज्यस्तरीय नाटय़ स्पर्धेत सहभागी होत होतो; परंतु आम्हाला मिळालेले वाईट निकाल व त्यात होणारे फेरबदल यांचा अनुभव येणाऱ्या नवोदितांना होऊ नये व रंगभूमीपासून दुरावू नये या भीतीपोटी या स्पध्रेचे आयोजन झाले आणि गेली सतत १० वष्रे आमच्या या आयोजनाचा आलेख हा वाढत गेला. प्राथमिक फेरीतही आम्ही प्रत्येक प्रयोगानंतर त्या त्या संस्थेला व महाविद्यालयाला परीक्षकांबरोबर त्यांना त्यांच्या उणिवांवर चर्चा करण्यास सांगतो, जेणे करून स्पर्धक हा पुढील वाटचाल करताना पुन्हा चुकू नये व सादरीकरणाचे आम्ही त्यांना प्रशस्तिपत्र देवून त्यांचे आभार व्यक्त करतो. मागील वर्षी ज्ञानेश्वर मर्गज, विष्णू सूर्य वाघ, अमित सुर्वे व किरण पोत्रेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

आमच्या आयोजनाचे रूप पाहून येत्या प्राथमिक फेरीच्या उद्घाटन सोहळ्यास तरुणांचे लाडके व अथर्व थिएटरचे निर्माते संतोष भारत काणेकर उपस्थित राहणार आहेत.
तुषार होडगे, कला विभागप्रमुख, ‘उंबरठा २०१२’

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it