अराऊण्ड द वर्ल्ड Print

alt

सेनोरिटा , शुक्रवार , २ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ग्लोबलायझेशनमुळे जग जवळ आलयं असं आपण म्हणतो, कारण इतर देशांतल्या विविध गोष्टी आपण घेत असतो. जसे की कपडय़ांची फॅशन- जिन्स, टी-शर्ट घालणे ही पद्धत आपण पाशात्त्य देशातून घेतली आहे. विंडचाईम्स्, फेंगशुई या गोष्टी आपण चायनामधून घेतल्या तसेच इकेबाना अर्थात पुष्परचना ही कला आपल्याकडे जपानहून आली आहे व आता भारतात रुजायला लागली आहे.
इकेबाना या जपानी शब्दाचा अर्थ होतो प्लान्ट ग्रोइंग. म्हणजेच झाड जसे उभे वाढते तसेच आडवेही वाढत असते. सर्वसाधारणत: आपल्याकडे इकेबाना या शब्दाचा अर्थ फक्त पुष्परचना असा घेतला जातो. परंतु ही पुष्परचना करताना झाडाच्या वाढीप्रमाणे उभी व आडवी केली जाते.
मल्टीनॅशनल कंपनीज्, फाइव्ह स्टार हॉटेल्स्, मोठमोठय़ा हॉस्पिट्ल्समध्ये नुसता स्टाफ प्रेझेंटेबल असून चालत नाही तर त्या वास्तूनेही प्रेझेंटेबल असले पाहिजे असे वाटू लागले आहे. त्यासाठी अंतर्गत सजावटीचे महत्त्व वाढ ूलागले आहे. त्या त्या वास्तूचा दर्शनी भाग जसा आक र्षक असला पाहिजे तसा तेथील कानाकोपरादेखील आकर्षक असला पाहिजे आणि या ठिकाणी जर निरनिराळ्या प्रकारच्या पुष्परचना ठेवल्या तर येणाऱ्या कस्टमर्सना, पेशंट्स् ना तसेच स्टाफलादेखील प्रसन्न वाटते आणि या पुष्परचना करणाऱ्या प्रशिक्षित लोकांना यासाठी पाचारण करण्यात येते. अशाच पुष्परचना करणाऱ्या मोनाली घोलप यांच्याशी केलेली ही बातचीत..
सुरुवातीला मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या मोनाली घोलप हिला इकेबाना करावेसे का व केव्हा वाटले? असे विचारताच ती म्हणाली,
‘‘जपानी भाषा शिकत असताना तेथील संस्कृतीचीही ओळख करून घ्यावीशी वाटली आणि यातूनच इकेबाना शिकावेसे वाटले. कंपनीत काम करत असताना इकेबानाविषयी काहीच मनात नव्हते. परंतु मुलाच्या जन्मानंतर मी नोकरी सोडली होती. त्या वेळी मी काम करत असलेल्या कंपनीला इकेबानाची ऑफर दिली. कंपनीला ही कल्पना पसंत पडली आणि माझ्या कामाला सुरुवात झाली. माझे काम आवडल्यामुळे तसेच इकेबाना ही संकल्पना नुकतीच येऊ घातल्यामुळे माझ्या कामाचा प्रचार आणि प्रसार झाला. बहुतेकदा ऑफिसेसमध्ये दर शनिवारी इकेबानासाठी बोलावितात.
इकेबाना ही कला कुठे शिकलात? साधारण शिकायला किती कालावधी लागतो? त्याच्या पण काही परीक्षा असतात का?
जॅपनीज लँग्वेज प्रोफेशियन्सी टेस्ट अर्थात जेएलपीटी येथून हा कोर्स पूर्ण केला. ही संस्था जपानी भाषा शिकविण्याचे कार्य करते. त्याचप्रमाणे तेथील कला जसे इकेबाना, ओरिगामी, बोन्साय इत्यादीचे वर्ग घेते. तसे पाहिल्यास साधारणत: इकेबानाच्या २५ लेव्हल्स असतात. परंतू पाच लेव्हल्स केल्यास आपण प्रशिक्षण देण्यास पात्र होतो.
इकेबानासाठी काही विशेष फुलांची आवश्यकता असते का? फुला-पानांची रचना करताना कोणते साहित्य वापरले जाते व फुले सुकू नयेत म्हणून काही विशेष काळजी घेतली जाते का?  
बहुतेकदा ग्लॅडिओडस, कार्नेशियम, जरबेरा यासारखी फुले वापरतात, परंतु या प्रकारात फुलांऐवजी पानांचा तसेच वाळलेल्या काडय़ा, पाने यांचाच जास्त वापर केला जातो. फुले, पाने फ्लॉवरपॉटमध्ये व्यवस्थित बसण्यासाठी पीन होल्डर, स्पंज यांचा वापर करतात. स्पंजमुळे पाणी धरून ठेवले जाते. त्यामुळे कमीत-कमी ३-४ दिवस फुले ताजी व टवटवीत राहतात.
स्वत:चे घर सांभाळून कॉर्पोरेट क्षेत्र जवळून बघण्याची संधी या व्यवसायामुळे मिळते. मैत्रिणींनो इकेबाना या कलेचा वापर आपण गणरायाची आरास करण्यासाठी करू शकतो. अशी इको-फ्रेंडली सजावट बाप्पाला नक्कीच आवडेल यात शंकाच नाही!