सोनाली कुलकर्णी , शुक्रवार , ९ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दसरा झाला. सीमोल्लंघनाचा आनंद आहेच, पण ओलांडणाऱ्या सीमेच्या आत असलेल्या सगळ्या काळासाठी आहे अपार कृतज्ञता. सोन्यासारख्या जुन्यासाठी. मागच्या वेळी मी पुढचा टप्पा म्हणाले. तो म्हणजे नव्या गाडीच्या आगमनाचा. दरम्यान थोडी चिडचिड, बरेच वाद, निर्धार, वॉक ऑऊटची धमकी. अशा काही गोष्टींपाशी आपण ठेचकाळतो. |
सोनाली कुलकर्णी , शुक्रवार , २ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आनंद कधी झाला पाहिजे आपल्याला? खरेदी करण्यापूर्वी, खरेदी करताना की खरेदी झाल्यावर? एक नक्की की तीनही पायऱ्यांवर हसू नक्की येत राहतं. तुम्ही खूप प्रगती करा. खूप पैसे मिळवा. तुमची भरभराट होऊ दे. सुख, समृद्धी हातात हात घालून तुमच्या आयुष्यात नांदू दे. तुम्ही स्टॉकमध्ये पैसे गुंतवा. तुमचे शेअर्स पन्नासपट किमतीला विकले जावोत. तुम्ही नवं घर घ्या. भरपूर कपडे घ्या. सोनं घ्या. चांदी घ्या. हिरे माणकंसुद्धा घ्या. पण. पण. पण. नवी गाडी घ्यायची की नाही याबद्दल पुन:पुन्हा विचार करा. |
सोनाली कुलकर्णी , शुक्रवार , २६ ऑक्टोबर २०१२ पहले प्यार की पहली चिठ्ठी. योग्य माणसाकडे नेऊन देण्याचा सुज्ञपणा खरंच होता का यांच्या डीपार्टमेंटमध्ये.? की हे एक तद्दन कल्पनारंजन फक्त.? आपण प्राणी पाळावे असे मला कधीच वाटलं नाही. फ्लॅटच्या सीमित क्षेत्रफळात कुत्र्यामांजरांना डांबून ठेवणं. आणि आपल्याला वेळ असेल तेव्हा त्यांना ‘फिरायला’ नेणं- तेही मुख्यत: त्यांच्या नैसर्गिक विधींसाठी!. हे काही मला पटत नाही. असो. हे माझं वाटणं झालं. मॉडर्न स्टडी वगैरे गोष्टी-भावनिक संतुलनासाठी.प्राणी पाळा. मासे बघा. कुत्र्यांना थोपटा. चिमण्यांना पाणी घाला. असले अनेक सल्ले देत असतात. त्याचाही एव्हाना धसका घेतलाय मी. कारण मधे एके ठिकाणी नामशेष होणाऱ्या चिमण्यांची प्रजा वाढवण्यासाठी बनवलेली लाकडी घरटी बघायला मिळाली. लगेच निसर्ग, पक्षी यांचा कळवळा वाटून घेतलीच मी विकत ती घरटी. पण खेदजनक बाब अशी.
|
सोनाली कुलकर्णी, शुक्रवार , १२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दूरवरून आकाशगंगा तटस्थ वाटली तरी अवकाशात कितीतरी बदल होतात. आपापल्या गती आणि स्वभावानुसार सगळे ग्रहगोल मार्गस्थ असतात. ह्य़ा सूर्यमंडळामध्ये पृथ्वीसुद्धा आहे. स्वत:भोवती फिरत ती सूर्याला प्रदक्षिणा घालते. ती सुद्धा बदलते आहे. अगदी रोज. |
सोनाली कुलकर्णी, शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
खूप दिवस आपल्यात रुतलेली कमीपणाची जाणीव जडशीळ करून सोडते आपल्या ‘स्व’ला. पण तो कमीपणा झडण्याची प्रक्रिया आपल्याला कितीतरी पटींनी नितांतसुंदर करून सोडते. हे मोठं तत्त्वज्ञान हा सिनेमा अगदी हळुवारपणे मांडतो. तिला पाहिल्यावर एकच शब्द सुचतो- ‘व्हायव्हॅशिअस!’ तिच्यात प्रचंड उत्स्फूर्तपणा आणि आत्मविश्वास आहे. ती तशी माझी ‘चुलत-मैत्रीण’. म्हणजे माझा फास्ट फ्रेंड- नीलेश कुलकर्णी- त्यांची ती मैत्रीण.
|
शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जगरहाटी आणि बदल हे समानार्थी शब्द असावेत. त्याचप्रमाणे प्रत्येक विषयात विज्ञान, इतिहास, भाषा, कला. सगळीकडे हिशोब हा धडाही समानच असावा. तो शिकणं किंवा समजून तरी घेणं अपरिहार्य होत चाललं आहे. इथलं दुकान? इथलं दुकान कुठे गेलं..? मी गोंधळून इकडे-तिकडे पाहात मोठय़ाने विचारलं. आसपास उभी असलेली माणसं चमकून वळून बघायला लागली. एक माणूस फोनवर ओरडत बोलत होता. |
शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
देणाऱ्याने देत जावे.. घेणाऱ्याने घेत जावे.. घेता घेता एक दिवस.. देणाऱ्याचे हातच घ्यावे.. विं. दा. करंदीकर आपल्याकडे अशा अनेक वस्तू असतात. ज्याचं काय करावं हे आपल्याला समजत नाही. आता न बसणारे नवे कपडे. ते कुणाला धड भेट देता येत नाहीत-किंवा मैत्रिणींना घे ना गं. मला जरा लहान होतोय हा टॉप. असं म्हणायला हल्ली आपण धजावत नाही. कपबश्या, लॅम्पशेड, चपला- बूट, कपडे, बेडशीट.. |
शुक्रवार , २१ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
देवळात जाताना घंटा वाजवण्याइतका बाहेर गेल्यावर टीप देणं स्वाभाविक होऊन बसलंय हल्ली! त्या उलट पुण्यातल्या माझ्या फेवरेट पार्लरमध्ये टीप घेणार नाही अशी नम्र सूचना आहे. बील आलं. कोण देणार, ह्यावर आमची जरा चढाओढ झाली. मग ज्याचा वाढदिवस-त्यानीच द्यायची ट्रीट असं मान्य झालं. आम्ही दहा जण होतो. बील झालं साडेनऊ हजार रुपये. बीलाच्या पैशाबरोबर माझ्या मित्रांनी टिप म्हणून पाचशेची नोट त्या लेदरच्या कव्हरमध्ये सरकवली सहजपणे. |
शुक्रवार १४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
परफेक्शनिस्ट हा जरा टोकाचा शब्द झाला. वक्तशीर, टापटिपीत, चोख असणे ही काही जणांची गरज असते. तो स्वभावच होऊन बसतो. पण हॅलो. त्यासाठी एनर्जीही खूप इन्व्हेस्ट करावी लागते. मध्ये एकदा एक मैत्रीण बरसलीच माझ्यावर अनपेक्षितपणे. ‘‘काय गं. तू काही विसरत कशी नाहीस? बघावं तेव्हा सगळं बरोबर न विसरता करतेस अगदी!’’ मी हसून म्हटलं, ‘‘अगं, ही तर कॉम्प्लिमेन्ट झाली. तू रुसक्या स्वरात का म्हणतीएस?’’ |
शुक्रवार , ७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
घर किती स्क्वेअर फुटांचं आहे हा प्रश्नच येत नाही. आपलं आपल्या घरावर प्रेम असतंच ना. ते कधीतरी घराला सांगायला पण पाहिजे. ते निमित्त मला मिळालं. घरी पाहुणे येणं किती छान असतं ना. कुणी म्हणेल ‘हॅलो? छान काय त्यात? किती प्लॅिनग करावं लागतं! जेवण, मेन्यू, खरेदी. सगळ्याचा विचार करावा लागतो. अॅडजस्टमेंट कराव्या लागतात. एक ना दोन!’ बरोबर आहे. बरोबर आहे. पण मी सोपे पाहुणे म्हणतीए. म्हणजे आवडणारे, हवेहवेसे वाटणारे, दडपण जाणवू न देणारे. आपल्याला आनंद देऊ करणारे.
|
सोनाली कुलकर्णी, शुक्रवार ३१ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
तीन महिन्यांपुर्वी नवा बुक शेल्फ बसवुन घेतला. कुणाला पाहिजेत बंगले आणि गाडय़ा. एक पुस्तक उघडलं की हव्या त्या सफरीवर जाता येतं. त्यातलीच ही काही. |
सोनाली कुलकर्णी, शुक्रवार , २४, ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कविवर्य रामदास फुटाणेंची एक उपहासात्मक कविता ‘भारत कधी कधी माझा देश आहे’- फार गाजली. प्रत्येक कविसंमेलनात, कार्यक्रमात या कवितेनी टाळी आणि वन्समोअर घेतला. पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची ही कविता- आज अधिकच ताजी वाटायला लागली आहे- ही किती लाजिरवाणी वस्तुस्थिती आहे. आज तिचा काही उल्लेखही नाहीए पेपरमध्ये. संपली ती. फिनिश्ड. शुक्रवारी सकाळी ती होती. दैनंदिन कामं करत होती. जगत होती. तिच्या भावविश्वातली सगळी माणसं तिच्याबद्दल निर्धास्त होती. |
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
Page 1 of 2 |