Viva Lounge Print

शुक्रवार , १२ ऑक्टोबर २०१२

राज्य महामार्गाच्या विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ. रश्मी करंदीकर यांना आपण भेटणार आहोत व्हिवा लाऊंजमध्ये. रश्मी करंदीकर यांनी भिवंडी, कल्याण, रत्नागिरी अशा अनेकविध संवेदनाक्षम भागामध्ये  पोस्टिंग करताना आपला वेगळा ठसा उमटविला. कवडास (शहापूर), कळंबोली तसेच नेरुळ येथील आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून त्यांनी केलेला तपास आणि अहवाल खूप गाजला.
सध्या राज्य महामार्गासंदर्भात हेल्पलाइन सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना अमलात आणण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. पोलीस दलातील नोकरीबाबत सुरुवातीला झालेला घरच्यांचा विरोध डावलून आपल्या कर्तृत्वाने अनेक तरुणींपुढे आदर्श निर्माण करणाऱ्या डॉ. रश्मी करंदीकर यांच्याशी गप्पा मारण्याची संधी आपल्याला मिळत्येय येत्या १८ ऑक्टोबरला. या भेटीमध्ये त्यांच्या करिअरविषयी अधिक जाणून घेता येईल.
स्थळ : पु. ल देशपांडे मिनी थिएटर, प्रभादेवी
दिनांक : १८ ऑक्टोबर २०१२
वेळ : दुपारी ३.००
हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.